मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून एक सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात. पण, याच शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहेत. शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर प्रभारी मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील बहराईचमधील एका प्राथमिक शाळेत ही घटना उघडकीस आली आहे. दुर्गा प्रसाद जैस्वाल असे शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे चुंबन घेतल्याचा संतापजनक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नराधम शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीशी अनुचित कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सावधपणे रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने शिक्षकावर निलंबनाची कारवाई करीत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Tata Institute of Social Science, Suspends Dalit Ph.D. Student, Ramdas KS, Misbehavior, Anti National Stance, tiss mumbai, tiss suspends phd student, mumbai tiss, tiss Suspends Dalit Student, tiss controversy,
‘टिस’कडून दोन वर्षांसाठी दलित विद्यार्थ्याचे निलंबन, वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

बहराईचमधील विश्वेश्वरगंज विकास खंड अंतर्गत शिवपूर बैरागी प्राथमिक शाळेत ही घटना घडली. संबंधित शिक्षक दुर्गा प्रसाद जैस्वाल हे जवळपास पाच वर्षांपासून शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, संबंधित शिक्षक दुर्गा प्रसाद जैस्वाल याने वर्गातील एका सत्रादरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याच्या डेस्कजवळ बोलावले आणि खुर्चीवर बसून तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घटनेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केला.

संबंधित नराधम शिक्षकाच्या वर्तणुकीबद्दल आता ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वीही हा नराधम शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसमोर नग्नावस्थेत झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा प्रकारे दुर्गा प्रसाद अनेक महिन्यांपासून शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर आता संतप्त पालकांनी या शिक्षकाच्या गैरवर्तनाबद्दल तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शिक्षक दुर्गा प्रसाद याला निलंबित करण्यात आल्याचा खुलासा शिक्षणाधिकारी मनमोहन यांनी केला. त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या फोटो आणि व्हिडीओची तपासणी सुरू आहे. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, अद्याप कोणतीही लेखी तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लेखी तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.