पंतप्रधान नरेंद्र मोदी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ११२ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे अनावरण करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळी कोईम्बतूर येथे दाखल होणार आहेत. ‘इशा योग केंद्र’ या ठिकाणी शिवप्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या कोईम्बतूर भेटीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर आणि संपूर्ण राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. प्रतिमा अनावरण करण्यात येणारे ठिकाण केरळातील पर्वत रेंजजवळ असून, उग्रवादी आणि माओवाद्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. ११२ फूट उंचीच्या या भव्य पुतळ्याची निर्मिती ‘ईशा फाऊंडेशन’ने कोईम्बतूरमध्ये केली आहे.

Maha Shivaratri 2017: महाशिवरात्रीत अशी करा शिवाची उपासना
Maha Shivaratri 2017 : जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

माध्यमातील वृत्तानुसार, पुतळ्याच्या अनावरणासाठी येथे दाखल होणाऱ्या पंतप्रधानांचे काळे झेंडे दाखवून स्वागत होऊ शकते. पुतळा तयार करण्यासाठी फाऊंडेशनने जंगलात खूप आतपर्यंतच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा काही स्थानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, पंतप्रधानांच्या आगमनानंतर यांच्याकडून निदर्शने करण्यात येणार असल्याचे समजते. आठवडाभरापूर्वी मद्रास उच्च न्यायालयात फाऊंडेशनविरोधात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.

‘हिल एरिया कंजर्व्हेशन अॅथॉरिटी’ची परवानगी न घेता फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य करून नियमांचे उल्लंघन केल्याचे माध्यमातील वृत्तात विरोधकांचा हवाला देत म्हटले आहे. डोंगराळ भागात कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी मंजुरी देण्याची जबाबदारी ‘हिल एरिया कंजर्वेशन अॅथॉरिटी’वर आहे. या सर्व प्रकाराची माहिती राष्ट्रीय हरित लवादाला देण्यात आली असून, फाऊंडेशनने आयोजित केलेल्या माहाशिवरात्री कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी लवादाकडे केली होती. या ठिकाणी दररोज दिवस-रात्र केली जाणारी अनेक वस्तूंची ने-आण वन्यजीवांसाठी धोकादायक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेच फाऊंडेशनने वनखात्याची परवानगीदेखील घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी, आपण जे काही करत आहोत ते नियमांनुसारच असल्याचे फाऊंडेशनचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता येथील श्वानांचीदेखील धरपकड सुरू असून, त्यांना शहरातील ‘डॉग शेल्टर’मध्ये पाठवण्यात येत आहे. या श्वानांना तेथे तीन ते चार दिवसांसाठी बंदिस्त ठेवण्यात येईल.