आइनस्टाइनचा सिद्धांत टिकला

आइनस्टाइनचा सामान्य सापेक्षतावादाचा १०० वर्षांपूर्वीचा सिद्धान्त अत्यंत कठीण अशा चाचणीतही खरा ठरला आहे. ही चाचणी अवकाश व काळाशी संबंधित होती. पृथ्वीपासून सात हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका विचित्र वर्तनाच्या द्वैती ताऱ्याच्या प्रणालीच्या संदर्भात हा सापेक्षतावादाचा सिद्धान्त तंतोतंत खरा उतरल्याचा दावा खगोलतज्ज्ञांनी केला आहे.

आइनस्टाइनचा सामान्य सापेक्षतावादाचा १०० वर्षांपूर्वीचा सिद्धान्त अत्यंत कठीण अशा चाचणीतही खरा ठरला आहे. ही चाचणी अवकाश व काळाशी संबंधित होती. पृथ्वीपासून सात हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका विचित्र वर्तनाच्या द्वैती ताऱ्याच्या प्रणालीच्या संदर्भात हा सापेक्षतावादाचा सिद्धान्त तंतोतंत खरा उतरल्याचा दावा खगोलतज्ज्ञांनी केला आहे.
नवे काय?
 सूर्याच्या वस्तुमानापेक्षा दुप्पट वस्तुमान असलेला न्यूट्रॉन तारा व त्याचा सहचरी श्वेतबटू तारा हे एकमेकांना अडीच तासांत प्रदक्षिणा घालतात. गुरुत्वीय सिद्धान्त अतिशय टोकाच्या स्थितीत सिद्ध करण्याचे आव्हान या ताऱ्यांच्या वर्तनामुळे निर्माण झाले होते. १९१५मध्ये आइनस्टाइनने जो सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला तो अतिटोकाच्या परिस्थितीत अवैध ठरतो असे वैज्ञानिकांचे मत होते. ही कमतरता दूर करण्यासाठी गुरुत्वाचे काही वेगळे वर्णन करता येईल अशीही आशा भौतिकशास्त्रज्ञांना वाटत होते, परंतु पीएसआर जे ०३४८+०४३२ या स्पंदक ताऱ्याच्या प्रणालीत आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताला पुष्टी देणारे निष्कर्ष हाती आले आहेत.
विशेष काय?
 एकमेकांभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांचा शोध नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या ग्रीन बँक टेलिस्कोपने लावण्यात आला होता. विविध प्रकारच्या दुर्बीणींमधून त्याचे निरीक्षण करण्यात आले होते. या प्रणालीत अतिटोकाच्या स्थितीत आइनस्टाइनचे सापेक्षतावादाचे समीकरण गुरुत्वीय प्रारणांचा अंदाज करू शकणार नाही, त्यामुळे कक्षीय ऱ्हासही सांगता येत नाही व त्यामुळे केवळ पर्यायी गुरुत्वीय सिद्धान्तच हा प्रश्न सोडवू शकतील असे वैज्ञानिकांचे मत होते.जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी या संस्थेचे पावलो फ्रेअरी यांनी सांगितले, की आइनस्टाइनचा सापक्षेतावादाचा सिद्धान्त येथे कुचकामी ठरेल, पण प्रत्यक्षात आइनस्टाइनने मांडलेली सर्व निरीक्षणे खरी ठरली आहेत. गुरुत्वीय लहरींचा थेट शोध घेण्यात यश येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हे संशोधन सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Principle of einstein is alive

ताज्या बातम्या