संसदेच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या बॅँक सुधारणा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकेतील कर्मचारी २० तारखेला देशव्यापी संपावर जाणार आहेत. बॅँकिं ग सुधारणा विधेयक हे देशाच्या हिताचे नाही. या विधेयकामुळे बॅँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होणार असल्याचा दावा झारखंड प्रदेश बॅँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर. ए. सिंह यांनी केला.या विधेयकामुळे खासगी भांडवलदारांची बॅँकांमधील निर्णयप्रक्रियेतील ढवळाढवळ वाढणार आहे, तसेच कंपन्यांचे थकीत कर्ज फेडण्यासाठी तितक्याच रकमेचे समभाग बॅँकांना देण्याची या   विधेयकातील तरतूद ही स्वीकारार्ह नसल्याचे सिंग यांनी सांगितले.
झारखंड प्रदेश बॅँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सुजीत घोष आणि सरचिटणीस एस. के. अदक हेदेखील या पत्रकर परिषदेमध्ये उपस्थित होते.