राजस्थानमधील चुरू आणि अलवार येथील भाषणामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाने राजस्थानच्या मुख्य निवडणुक अधिकाऱयाकडे केली आहे.
भाजपचे उपाध्यक्ष ओंकारसिंग लखावत यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. यात राहुल गांधी यांची चुरू आणि अलवार येथील भाषणे जातीयता पसरविणारी व प्रक्षोभक असल्याचा आरोप केला आहे.
तसेच “राहुल गांधी यांनी समाजात आणखी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि गुजरातमधील हिंसाचाराबद्दल भाजपवर आरोप केले आहेत” असेही तक्रारीत म्हटले आहे.