‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया’चे चेअरमन आणि माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी यूपीए सरकारवर केलेल्या खळबळजनक आरोपांवरून राज्यसभेत ‘एआयएडीएमके’च्या सदस्यांनी गोंधळ घातला. यामुळे सभापती हमीद अन्सारी यांना राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले आहे.
यूपीए सरकार पडू नये म्हणून एका भ्रष्ट न्यायाधीशाचा कार्यकाळ वाढवून त्यांना मद्रास उच्चन्यायालयात बढती देण्यात आली होती, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे. काटजूंचे हे विधान राज्यभेत गोंधळाचे कारण ठरले आहे.
मद्रास उच्चन्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते. तरीसुद्धा त्यांना तामिळनाडूतील राजकीय वरदहस्तांनी पाठीशी घालून जिल्हा न्यायाधीश पदावरून बढती देऊन मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनविण्यात आल्याचा आरोप काटजू यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2014 रोजी प्रकाशित
भ्रष्ट न्यायाधीशाला ‘यूपीए’ सरकारकडून बढती!; काटजूंच्या आरोपावरून राज्यसभेत गदारोळ
'प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया'चे चेअरमन आणि माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी यूपीए सरकारवर केलेल्या खळबळजनक आरोपांवरून राज्यसभेत 'एआयएडीएमके'च्या सदस्यांनी गोंधळ घातला.

First published on: 21-07-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha disrupted over justice markandey katjus corruption in judiciary allegations