पीटीआय, नवी दिल्ली

सरन्यायाधीशांना वगळून एका समितीद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची तरतूद असलेल्या नव्या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. दुसरी बाजू ऐकल्याशिवाय आम्ही स्थगिती देऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.  

case of accommodating contract workers Municipal administration rushes after Supreme Court order
कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ
Supreme Court asks poll panel about penalties for EVM manipulation
घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने नवीन कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आणि केंद्राला नोटीस बजावली. नव्या कायद्याला स्थगिती देण्याची मागणी काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी याचिकेद्वारे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी अधिकृत समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश न केल्याच्या राजकीय वादात ठाकूर यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. वकील गोपाल सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्र सरकारला निवडणूक आयोगात नियुक्त्या करण्याचे विशेष अधिकार देणारा नवा कायदा रद्द करण्याची विनंती केली.

हेही वाचा >>>जम्मूमधील पूंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार!

सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने ‘‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी निष्पक्ष आणि स्वतंत्र निवड समितीसह मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली’’ लागू करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. नवीन कायद्यात अशी तरतूद आहे की ‘‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान (अध्यक्ष), संसदेतील विरोधी पक्षनेते (सदस्य), केंद्रीय मंत्रिमंडळाचा समावेश असलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाईल.

सरन्यायाधीशांना निवड समितीमधून काढून टाकून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी मोदी सरकारवर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये आपल्या आदेशात म्हटले होते की पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड करतील.

नव्या कायद्याला आक्षेप का?

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान (अध्यक्ष), संसदेतील विरोधी पक्षनेते (सदस्य), केंद्रीय मंत्रिमंडळाचा समावेश असलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाईल, अशी तरतूद नव्या कायद्यात आहे. यातून सरन्यायाधीशांना वगळण्यात आल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला आहे.