‘कॅग’ने इन्फोटेल ब्रॉडबँड सव्‍‌र्हिसेस या कंपनीला देण्यात आलेले देशव्यापी स्पेक्ट्रम रद्द करण्याचा आदेश दिला आहे. लिलावाच्या नियमांचे उल्लंघन करून सगळी प्रक्रियाच ताब्यात घेतल्याचा या कंपनीवार आरोप आहे.
 महालेखापरीक्षकांनी दूरसंचार खात्याला पाठवलेल्या मसुदा अहवालात म्हटले आहे की, या कंपनीने लिलावाची प्रक्रियाच ताब्यात घेतली, याकडे लक्ष पुरवण्यात दूरसंचार खात्याला अपयश आले आहे. यात इन्फोटेल ब्रॉडबँड सव्‍‌र्हिसेस प्रा. लि या कंपनीने या लिलावात अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. त्याच्या निव्वळ किमतीच्या ५ हजार पट जास्त किंमत देऊन त्यांनी हा लिलाव जिंकला. लिलावाच्या काही तास अगोदर रिलायन्सने ही कंपनी ताब्यात घेतली व तिचे नाव ‘रिलायन्स जियो’ असे ठेवले.
रिलायन्स कंपनीने म्हटले आहे,की कॅगच्या अशा कुठल्याही अहवालाची आम्हाला कल्पना नाही ज्यात लिलावाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. या प्रक्रियेवर भारत सरकारची देखरेख असते. मसुदा अहवालानुसार आयबीएसपीएल ही आयएसपी यादीतील १५० वी कंपनी होती व त्यांनी २५२.५० कोटी रूपये बयाणा रक्कम व लिलाव रकमेपोटी १२८४७.७७ कोटी  रूपये भरले जे एकूण किंमतीच्या पाच हजार पट होते. नंतर त्यांनी कंपनी लिलाव पूर्ण झाल्याच्या दिवशी विकली. रिलायन्सच्या प्रवक्तयाने सांगितले की, आरडब्लूय ए स्पेक्ट्रमचा लिलाव स्पर्धात्मक होता. त्याला अंतिम किंमत पॅन इंडिया स्पेक्ट्रमच्या सहा पट आली, त्यामुळे साटेलोटे करून लिलाव जिंकल्याचा आरोप चुकीचा आहे. गोपनीय माहिती उघड करणे चुकीचे असून आम्ही ती फेटाळून लावत आहोत.