प्रेषिताची निंदा केल्याच्या आरोपावरून दोषी ठरलेल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातील इसमास येथील न्यायालयाने देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चित्राल जिल्ह्य़ाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अझर अली खान यांनी बुधवारी हजरत अली शाह नामक व्यक्तीस ही शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी १० मार्च रोजी शाहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रेषितांविषयी धर्मघाती वक्तव्य केल्याचा आरोप शाहवर ठेवण्यात आला होता.
शाहने केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्या गावातील नागरिकांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयात शिक्षा सुनावणीच्या वेळी हेच गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते, असे ‘द डॉन’ने म्हटले आहे.
प्रेषितांबद्दल अनुदार उद्गार काढल्यानंतर शाहची आई, भाऊ व अन्य नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध संपल्याचे घोषित केले होते. न्यायाधीशांनी शाहला दंडापोटी एक लाख रुपये भरण्याचे तसेच १० वर्षे तुरुंगवास भोगण्याचे आदेशही दिले आहेत. धर्मनिंदा केल्याप्रकरणी दोषी ठरल्याने शिक्षेस पात्र ठरलेला हजरत अली शाह हा चित्राल जिल्ह्य़ातील पहिलाच इसम असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
प्रेषिताची निंदा : दोषी व्यक्तीस देहदंडाची शिक्षा
प्रेषिताची निंदा केल्याच्या आरोपावरून दोषी ठरलेल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातील इसमास येथील न्यायालयाने देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चित्राल जिल्ह्य़ाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अझर अली खान यांनी बुधवारी हजरत अली शाह नामक व्यक्तीस ही शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी १० मार्च रोजी शाहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
First published on: 16-11-2012 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious comment proved person get death sentence