लंडनमधील एका रुग्णालयात फोन करून तेथील परिचारीकेशी जीवघेणा खटय़ाळपणा करणा-या ऑस्ट्रेलियातील दोन रेडिओ जॉकींपैकी एकाला साऊदन क्रॉस ऑस्टेरेओ  कंपनीकडून ‘टॉप जॉक’ म्हणून नावाजण्यात आले आहे. मायकल ख्रिस्तिन असे त्याचे नाव असून सहा महिन्यांपूर्वी त्याला पिन्स विल्यमच्या पत्नी कॅथेरिन यांची शुश्रूषा करणा-या परिचारिकेच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
‘साऊदन क्रॉस ऑस्टेरेओ’ने या प्रसंगी आपल्या कर्मचा-याबद्दल काढलेल्या निवेदन पत्र ख्रिस्तीनला गौरविणे हे ‘थ्रील’ असल्याचे म्हटले आहे.