किव्हमध्ये स्फोटांचे आवाज, नागरिकांचे स्थलांतर, एका विमानतळावर ताबा

Over 100 whales rescued off Australian coast
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून १०० हून अधिक व्हेलची सुटका
Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक

रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला.

   काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. शुक्रवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर  शेकडो महिला आणि मुले शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी उभे असल्याचे आढळले. रशियाने मात्र किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले.   

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे. किव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र किव्हवर हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, किव्ह येथे पाडण्यात आलेले विमान युक्रेनचे होते, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, तर ते विमान रशियाचे असल्याचा दावा युक्रेनने केला. आपण २०० हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीने अन्तोनोव्ह विमानतळावर ताबा मिळवला, असा दावा रशियन लष्कराने केला.

प्राथमिक आकडेवारीनुसार, गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष  वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत. 

दरम्यान भारताच्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची  पुन्हा शनिवारी बैठक होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पुतीन युक्रेनशी चर्चेस तयार

बीजिंग : युक्रेन आणि रशियाने चर्चा करून वाढत्या पेचप्रसंगातून मार्ग काढावा, असे आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी शुक्रवारी युक्रेनशी उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी दर्शवली. युक्रेनशी उच्चस्तरीय चर्चेची तयारी असल्याचे पुतीन यांनी चीनचे अध्यक्ष जिनिपग यांना सांगितले, असे वृत्त चिनी माध्यमांनी शुक्रवारी दिले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही पुतीन यांना वाटाघाटीचे आवाहन केले होते.

युद्धस्थिती

युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबार, स्फोटांचे आवाज, रशियन रणगाडे किव्हच्या सीमेवर.

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ ठार, ३१६ जण जखमी. रशियाचे ४०० सैनिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा.

युक्रेनची राजधानी किव्हमधील नागरिकांचा भुयारी मेट्रो स्थानकांत आश्रय. अनेक नागरिक पाश्चिमात्य देशांच्या आश्रयाला.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या युरोपमधील खासगी मालमत्ता गोठवण्याचा युरोपीय महासंघाचा निर्णय. 

रशियावर आणखी निर्बंध लादण्याची युक्रेनचे मित्रराष्ट्रांना आवाहन.

भारतीयांसाठी खास विमाने  

युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी युक्रेनच्या शेजारी देशांची मदत घेण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली जात असल्याचेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.