Premium

“ईव्हीएमविरोधात शिवसेनेने आवाज उठवावा म्हणून किरीट सोमय्या…”, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

आज होणारी इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचीही माहिती संजय राऊतांनी दिली.

What Sanjay Raut Said?
संजय राऊत काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाच राज्यांतील निवडणुकांचा कल समोर आला आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपाने सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला अवघ्या एका राज्यातच यश मिळालं. त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या विरोधकांच्या मागणीला जोर आलाय. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा जोर दिला. तसंच, यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवरही टीका केली. आज ते दिल्लीत असून तेथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमबाबत भाजपानेच शंका उपस्थित केली होती. काँग्रेस राजवटीच्या काळात हा मुद्दा सगळ्यात आधी सुब्रमण्यम स्वामी, किरीट सोमय्या यांनीच कोर्टात नेला होता. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता याचिका केली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवावा म्हणून सोमय्या प्रेझेंटन्शन घेऊन शिवसेना भवनात आले होते. डॉ.स्वामी आले होते. डॉ. स्वामींचं यावरचं पुस्तक वाचा.

तसंच, “उद्धव ठाकरे म्हणाले की शंकांचं निरसन करायचं असेल तर देशातील कोणतीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. पोस्टल वोटिंग बॅलेट पेपरवर येतात. त्यामध्ये १९९ जागांवर काँग्रेस आघाडीवर होती. मग आमचा ईव्हीएमवर विश्वास कसा बसेल?” असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

हेही वाचा >> संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना पत्र, “महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचे धिंडवडे..” म्हणत केले ‘हे’ आरोप

इंडिया आघाडीची बैठक ढकलली

पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा सावकरण्याकरता नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी ही बैठक होणार होती. या बैठकीला आज ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार होते. परंतु, इतर नेत्यांना आज वेळ नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, आज इंडिया आघाडीची बैठक होणार होती. मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला येणार होते. परंतु, इतर नेत्यांना आज येणं शक्य नव्हतं. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक १६ किंवा १८ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. जे काही समज-गैरसमज दाखवले जात आहेत, पण तसे नाहीय, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut criticise bjp over evm and taking kirit somaiya name saying sgk

First published on: 06-12-2023 at 10:47 IST
Next Story
“राहुल गांधींना राजकीय परिपक्वता येणं बाकी”, प्रणव मुखर्जींनी सांगितलं होतं, ‘या’ पुस्तकात मुलगी शर्मिष्ठा यांचा दावा