आर्यलड सविता हलप्पनवारचा मृत्यू गर्भपात संबंधीच्या कडक कायद्यामुळे झाला नसल्याचा निर्वाळा येथील आयरिश कॅथॉलिक बिशप समितीने दिला आहे. या प्रकरणी देशात देख व्यक्त करण्यात येत असून या विषयावर सोमवारी व्यापक चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  
र्गभारपणात बाळ आणि मातेच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि दोघांचे जीव अनमोल असल्याची शिकवण आम्ही देतो. या कायद्यासंबंधीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शक तत्त्वे येथील डॉक्टर आणि परिचारिकांना ठाऊक आहेत. र्गभारपणात गंभीर आजारी असलेल्या मातेवर औषधोपचार आणि त्या दोघांचे प्राण वाचविण्यासाठी उपचार करण्याची परवानगी रुग्णालयांना असल्याचे बिशप यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात सविताचा आयरिश रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता.