scorecardresearch

Premium

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव सरकारला पद्मभूषण पुरस्कार परत करणार

गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकारांकडून सुरू असणाऱ्या ‘पुरस्कार वापसी’ आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धिप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या सरकारी गळचेपीचा निषेध म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली. भार्गव हे भारतातील पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएमबी) संस्थापक संचालक […]

Scientist P M Bhargava, Padma Bhushan , rising intolerance, Awards, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news

गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकारांकडून सुरू असणाऱ्या ‘पुरस्कार वापसी’ आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धिप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या सरकारी गळचेपीचा निषेध म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली. भार्गव हे भारतातील पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएमबी) संस्थापक संचालक आहेत. मोदी सरकार देशामध्ये जातीय आणि धर्माच्या आधारावर फूट पाडणाऱ्या गटांना मोकळीक देत असल्याचा आरोप भार्गव यांनी यावेळी केला. एखादा कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करू शकतो. मात्र, मी वैज्ञानिक आहे. मी माझा निषेध कसा व्यक्त करणार?, त्यामुळेच मी मला मिळालेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्याचे पी.एम. भार्गव यांनी सांगितले. त्यासाठी ते लवकरच केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत.

१२ दिग्दर्शकांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत
फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे केंद्र सरकारला काहीसा दिलासा मिळाला असला तरी देशातील १२ दिग्दर्शकांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यामुळे सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. एफटीआयआयचा न सुटलेला तिढा आणि देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत या दिग्दर्शकांना आपापले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन, परेश कामदार, निशिता जैन, किर्ती नाखवा, हर्षवर्धन कुलकर्णी, हरी नायर, राकेश शर्मा, इंद्रनील लहरी आणि लिपिका सिंग दराई या दिग्दर्शकांचा समावेश आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scientist p m bhargava to return padma bhushan to protest govt attack on rationalism reasoning

First published on: 29-10-2015 at 10:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×