२०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीतल्या तिहार तुरूंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप केले आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा कथित बॉयफ्रेंड म्हणूनही सुकेश ओळखला जातो. या सुकेशने दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना चिठ्ठी लिहिली आहे. याच चिठ्ठीत त्याने ही बाब नोंदवली आहे.

काय म्हटलं आहे सुकेश चंद्रशेखरने?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन या दोघांकडून माझा मानसिक छळ सुरू आहे तसंच मला धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या विरोधातल्या तक्रारी मागे घे हे सांगत मला त्रास दिला जातो आहे असंही सुकेशने पत्रात लिहिलं आहे.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन हे तुरूग प्रशासनाच्या आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मला धमक्या देत आहेत तसंच मला मानसिक त्रास देत आहेत. मला किती त्रास दिला जाईल आणि मी काय अस्वस्थ कसा राहिन हे पाहात आहेत. एक महिन्यापूर्वी जेव्हा मी मंडौली जेल १४ या ठिकाणी होतो तेव्हा सत्येंद्र जैन यांनी तुरुंगाचे अधीक्षक राजेंद्र आणि उपअधीक्षक जय सिंह या दोघांनाही मला धमक्या देण्यास सांगितलं. मी कुणाच्याच धमक्यांपुढे नमणार नाही असंही सुकेशने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

३१ डिसेंबरलाही पाठवला गेला होता मेसेज

सुकेशने हा आरोप केला आहे की सत्येंद्र जैन यांनी त्याला ३१ डिसेंबरच्या दिवशीही धमकी दिली होती. सत्येंद्र जैन यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते कुठे आहेत ते सांग ही तुला लास्ट वॉर्निंग आहे असं मला धमकवण्यात आलं होतं असंही सुकेशने पत्रात म्हटलं आहे. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते चॅट, स्क्रिन शॉट आणि व्हॉईस रेकॉर्डिंगच्या स्वरूपातले आहेत हे पुरावे माझ्याकडे परत मागण्यात आले होते. त्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत असंही सुकेशने म्हटलं आहे.

सुकेश जॅकलिनच्या आयुष्यात कसा आला?

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.

जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.

हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.