scorecardresearch

Premium

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

भाजपाविरोधी नव्या आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश असेल का? या मुद्द्यावरून सध्या बरीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Sharad-Pawar-PTI5
शरद पवार (संग्रहीत छायाचित्र)

देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपाविरोधी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधी पक्षांची नवी आघाडी देशात आकाराला येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही शक्यता फक्त तर्क नसून वास्तव असल्याचीच खात्री पटू लागली आहे. खुद्द शरद पवार यांनी देखील २०२४मध्ये भाजपाला सक्षम पर्याय उभा करण्याविषयी भूमिका मांडली आहे. मात्र, त्याच वेळी युपीएचं भवितव्य काय असेल? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.

भाजपाविरोधी पक्षांच्या नव्या आघाडीमध्ये काँग्रेस असेल का? या प्रश्नावरून आता राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. सर्व विरोधी पक्ष नव्या आघाडीत गेल्यास युपीएचं भवितव्य धोक्यात येऊ शकेल. त्यामुळे नव्या आघाडीत काँग्रेस देखील असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील प्रचंड तणावपूर्ण झालेल्या संबंधांमुळे हा प्रश्न अधिकच वास्तववादी ठरत असताना त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीतच शरद पवारांनी ही भूमिका मांडल्यामुळे यावर दोन्ही नेत्यांचं एकमत असेल असाच अर्थ काढला जात आहे.

Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…
meeting of foreign ministers of brics countries held in cape town
भारत-कॅनडात संवाद हवा, दहशतवादाची समस्या सोडवावी; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
sharad pawar (6)
येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
Janhit rss party Madhya Pradesh assembly elections
Madhya Pradesh : माजी संघ प्रचारकांनी केली ‘जनहित’ पक्षाची स्थापना, भाजपाविरोधात निवडणुकीत उतरणार

“काँग्रेससोबत की शिवाय हा मुद्दा नाही”

भाजपाविरोधात उभी राहणारी नवी आघाडी ही काँग्रेसशिवाय असेल की काँग्रेससोबत हा मुद्दाच नसल्याचं शरद पवार म्हणाले. “काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे”, असं म्हणत काँग्रेसही या आघाडीत असू शकेल, हे पवारांनी स्पष्ट केलं. “कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं”, असं पवार म्हणाले.

नव्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार?

दरम्यान, भाजपाविरोधी नवी आघाडी तयार झाल्यास, तिचं नेतृत्व कोण करणार? हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे. मात्र, आमच्यासाठी तो मुद्दा महत्त्वाचा नसल्याचं पवार म्हणाले आहेत. “नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचं नेतृत्व असेल वगैरे ही दुय्यम बाब आहे”, असं पवार म्हणाले.

“२०२४च्या निवडणुकांमध्ये…”, ममता बॅनर्जींसोबत चर्चेनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका!

“भाजपाला पर्याय द्यायला हवा”

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. “आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar mamata banerjee meet congress part of anti bjp alliance pmw

First published on: 01-12-2021 at 17:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×