लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हे त्यांना जिथं तैनात करण्यात आलंय तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू येथे म्हटलं आहे. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागात दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली. गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात एक रोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.

आणखी वाचा- आता विस्तारवादाचं युग संपलं; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

आणखी वाचा- ‘आपण चर्चा करतोय ना? मग असं कशाला करायचं?’; मोदींच्या लडाख भेटीनंतर चीनची नरमाई

तुमचं शौर्य, तुमची हिंदी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेलं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचं साहस, तुमचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तुमचे बाहु इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरली आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेला निमू ११ हजार फूट उंचावरील सर्वात खडतर प्रदेश

संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याबाबत प्रचंड अभिमान आहे. तुम्ही इथे आहात त्यामुळे तुमच्या बाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच गलवान खोऱ्यात ज्या २० जवानांना शहीद व्हावं लागलं त्यांना आज मी पुन्हा एकदा आदरांजली वाहतो असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.