स्पेनमधील पामप्लोना शहरातील सुप्रसिद्ध ‘सॅन फर्मिन’ उत्सवादरम्यान उधळलेल्या बैलांनी शनिवारी प्रचंड हैदोस घातला़  त्यामुळे या उत्सवासाठी जमलेल्या सुमारे २१ जणांना रुग्णालयाची वाट धरावी लागली़.
या उत्सवाच्या सहाव्या दिवशी बैल आणि रेडय़ांची शहरातील चिंचोळ्या मार्गावरून शर्यत लावण्याची प्रथा आह़े  या वेळी पारंपरिक पांढरे आणि लाल वस्त्र परिधान केलेली मंडळी या जनावरांच्या वाटा रोखतात आणि त्यांना अपेक्षित ठिकाणांपर्यंत पळविण्यात येते, परंतु ही शर्यत सुरू असताना सहा बैल आणि सहा रेडय़ांचा एक कळप अनावर झाला आणि समोरच्या लोकांनाच आपल्या खुरांखाली चिरडण्यास सुरुवात केली़  त्यामुळे उत्सवात एकच गोंधळ उडाला़  अखेर महत्प्रयासाने या कळपाला दोर लावण्यात संबंधित यंत्रणांना यश आल़े, परंतु तोपर्यंत सुमारे २१ जण रुग्णालयात आडवे झाले होत़े