जर्मनीची टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिची केरळ सरकारने आयुर्वेद उपचार पद्धतीच्या प्रसारासाठी सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली आहे. १९८० ते १९९० या काळात तिने टेनिसचे क्षेत्र गाजवले होते. ४६ वर्षांची स्टेफी ग्राफ हिची नेमणूक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी सांगितला.
केरळच्या पर्यटन विभागाने स्टेफी ग्राफबरोबरच्या करारास मान्यता दिली असून ‘व्हिजिट केरला’ या योजनेत तिची नेमणूक करण्यात आली आहे.
केरळला आयुर्वेदाची जुनी परंपरा असून शरीर व मनाची संपूर्ण उपचारपद्धती म्हणून आयुर्वेदाचा विचार केला जातो. तेथे देश व जगभरातून लोक उपचारासाठी येत असतात.
स्टेफी ग्राफने २२ ग्रँड स्लॅम सिंगल विजेती पदे मिळवली असून ती १९९९ मध्ये निवृत्त झाली. तिचा विवाह ऑक्टोबर २००१ मध्ये आंद्रे आगासी याच्याशी झाला होता.
३७७ आठवडे ती जागतिक महिला टेनिस संघटनेकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती, आतापर्यंत कुणाही पुरूष व महिला खेळाडूने हा विक्रम मोडलेला नाही.