वेदना असह्य़ झाल्या व आपण आप्तांसाठी ओझे आहोत असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली, तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू, असे मत ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केले आहे.
हॉकिंग ७३ वर्षांचे असून गेल्या अनेक वर्षांपासून मोटर न्यूरॉन डिसीजने आजारी आहेत. हॉकिंग यांनी सांगितले, की एखाद्याला त्याच्या इच्छेविरोधात जिवंत ठेवणे हे योग्य नाही. २०१३ मध्ये त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांचे जगणे अवघड झाले आहे त्यांना साहाय्यभूत आत्महत्येचा मार्ग खुला असला पाहिजे. त्याचा गैरवापर मात्र होता कामा नये.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आपल्याला एकटेपणाची भावना जाणवते. तुम्ही काय गमावलेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी व्यवस्थित असतो तर पोहायला जाण्याची इच्छा होती. जेव्हा माझी मुले तरूण होती तेव्हा त्यांच्याशी मला शारीरिक अर्थाने खेळता आले नाही, त्याची खंत वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2015 रोजी प्रकाशित
..तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार- स्टीफन हॉकिंग
वेदना असह्य़ झाल्या व आपण आप्तांसाठी ओझे आहोत असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली, तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू, असे मत ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केले आहे.

First published on: 04-06-2015 at 02:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stephen hawking i would consider assisted suicide