जर्मनीतील भारताच्या राजदूत सुजाता सिंह यांची भारताच्या परराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली आहे. सुजाता सिंह यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत अनेक वर्षे काम केले आहे. १९७६ सालच्या भारतीय परराष्ट्र सेवा तुकडीतील सुजाता सिंह या परराष्ट्र कार्यालयात काम करणाऱया तिसऱया महिला अधिकारी ठरणार आहेत. २००९-१० साली ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणाचा ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सेवा विभागाशी समन्वय साधून छडा लावण्यात सुजाता सिंह यांचा मोलाचा वाटा होता. सुजाता सिंह या उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल टी.व्ही.राजेश्वर यांच्या कन्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sujatha singh to be indias next foreign secretary
First published on: 02-07-2013 at 11:34 IST