अयोध्येत  रामजन्मभूमी परिसरात यात्रेकरूंना किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणाऱ्या आपल्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रह्मण्यम यांनी केली आहे.
त्यांनी सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांच्याकडे अर्ज केला असून याबाबतचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत किंवा नाही हे स्वामी यांनीच तपासून घ्यावे, जर युक्तिवाद पूर्ण झाले असतील तर त्यानंतरची तारीख देऊ.
स्वामी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने १९९६मध्ये वादग्रस्त ठिकाणी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला होता. स्वामी यांनी अर्जात म्हटले आहे की, हजारो हिंदू लोक अयोध्येत तीर्थाटनासाठी येतात. त्यांना रामजन्मभूमीत जाऊन पूजा करता येत नाही त्यामुळे त्या भागात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.