तालिबान येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ अफगाण सैनिक ठार झाले.
हा हल्ला रविवारी संध्याकाळी कारुख जिल्ह्यातील हेरात याठिकाणी झाला असल्याची माहिती इसानुल्ला हयात यांनी दिली आहे.

हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी गटाने स्विकारलीनसून हल्ल्यात ११ सैनिक जागीच ठार झाले. तर, इतर चार सैनिक गंभीर जखमी झाल्याचे हयात यांनी सांगितले.
सैनिकांची एक तुकडी ट्रकमधून गस्तघालत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. देशभरात हल्लेकरण्यासाठी तालिबान्यांनी मिशन अझ्म सुरू केले आहे. त्यांच्या कृत्यामुळे गेल्या उन्हाळ्यात दशकातील सर्वाधिक रक्तपात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नाटोच्या फौजा स्वदेशी परतल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण सैनिक दहशतवाद्यांना एकट्याने सामोरे जात आहेत. तब्बल १३ वर्षांनतर नाटोच्या फौजा स्वदेशी गेल्या असल्याने अफगाण सैनिकांना एकट्यानेच दहशतवाद्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी काहीकाळ नाटोच्या फौजांना थांबावे लागले होते. परंतू या प्रांतात इथून पुढे अफगाण फौजांनाच दहशतवाद्यांचा सामना करावा लागणार आहे.