नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज होत येथील एजेके महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ४० फूट उंच केक तयार केला आहे. यापूर्वी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या ३२ फूट उंचीच्या केकचा विक्रम मोडल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. १५ विद्यार्थ्यांनी मिळून हा केक १८ तासांत तयार केला. यासाठी २२०० अंडी, ३३५ किलो मैदा, २१५ किलो क्रीम, १२० किलो सुकामेवा आणि ६८० किलो साखर वापरण्यात आली. हा केक एकूण दहा थरांचा करण्यात आला आहे. यापूर्वी असा केक चीनने तयार केला होता. मात्र तो ३२ फूट उंचीचा आणि ८ थरांचा होता. लहानशा गावातून आलेले विद्यार्थी काय करू शकतात याचा अंदाज यावा हेच या मागील उद्दिष्ट असल्याचे महाविद्यालयाचे सचिव अजित कुमार लाल यांनी सांगितले.
हा केक नववर्षांच्या पूर्वसंध्येस कापण्यात येणार असून, विविध अनाथाश्रमांमध्ये पाठविला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
कोइम्बतूरमध्ये जगातील सर्वात उंच केक!
नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज होत येथील एजेके महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ४० फूट उंच केक तयार केला आहे. यापूर्वी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या ३२ फूट उंचीच्या केकचा विक्रम मोडल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
First published on: 30-12-2012 at 01:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tallest cake in the world at city college