भारताने बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले, तर बांगलादेशातील निम्मे लोक त्या देशातून बाहेर पडतील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायदा कशा प्रकारे भारताच्या १३० कोटी लोकांच्या विरोधात आहे हे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिद्ध करावे, असे आव्हानही रेड्डी यांनी येथील संत रविदास जयंती समारंभात बोलताना दिले.

‘भारताने बांगलादेशींना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव दिला, तर निम्मा बांगलादेश रिकामा होईल. भारतीय नागरिकत्व मिळणार असेल तर त्या देशातील निम्मी लोकसंख्या भारतात येईल. त्यांची जबाबदारी कोण घेईल? केसीआर की राहुल गांधी?’, असा प्रश्न रेड्डी यांनी विचारला.