आर्यलडमधील गर्भपाताविरोधातील जाचक कायद्यांमुळे जीव गमवाव्या लागलेल्या सविता हलप्पनवार या भारतीय महिलेच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातून गॅलवे युनिव्हर्सिटी रुग्णालयातीलतीन डॉक्टरांना काढून टाकण्यात आले आहे. आर्यलडचे पंतप्रधान एन्डा केन्नी यांनी ही माहिती दिली.
व्यवसायाने दंतवैद्यक असलेल्या सविता हलप्पनवार यांना गर्भपात करून घेण्यास गॅलवे रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिला. त्यासाठी आयरिश कायद्यांचे कारण त्यांनी पुढे केले होते. त्यामुळे सविताला जीव गमवावा लागला. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले. भारतानेही यासंदर्भात आर्यलडकडे तीव्र निषेध नोंदवला. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान केन्नी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात डॉक्टरांचे पथक नेमले. मात्र, या पथकात गॅलवे रुग्णालयातील त्या तीन डॉक्टरांचाच समावेश करण्यात आला. त्यामुळे सविताचे पती प्रवीण हलप्पनवार यांनी चौकशीला सहकार्य न करण्याचे धोरण स्वीकारले. केन्नी यांनीही तातडीने या तीनही डॉक्टरांना चौकशी पथकातून काढून टाकले. त्यामुळे आता सविताच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी चार डॉक्टरांचे पथक करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
चौकशी पथकातून तीन डॉक्टरांची हकालपट्टी
आर्यलडमधील गर्भपाताविरोधातील जाचक कायद्यांमुळे जीव गमवाव्या लागलेल्या सविता हलप्पनवार या भारतीय महिलेच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातून गॅलवे युनिव्हर्सिटी रुग्णालयातीलतीन डॉक्टरांना काढून टाकण्यात आले आहे. आर्यलडचे पंतप्रधान एन्डा केन्नी यांनी ही माहिती दिली.
First published on: 22-11-2012 at 07:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three doctors sacked from enquiry team