झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. यावेळी सीआरपीएफ जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केलं असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. बेलभा घाट परिसरात ही चकमक सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते.
Giridih: Bodies of 3 Naxals along with 1 AK-47 rifle, 3 magazines & 4 pipe bombs recovered after 7 battalion of CRPF carried out special operations in forest area in Belbha Ghat today wherein an encounter broke out with Naxals. One CRPF personnel lost his life. #Jharkhand pic.twitter.com/J9UK86ME2f
— ANI (@ANI) April 15, 2019
सीआरपीएफच्या ७ बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरु केलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआऱपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्या मृतदेहासोबतच एक एके-४७ रायफल, ३ मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत सीआऱपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.