१.‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत औरंगाबादमध्ये झोमॅटो कामगाराला मारहाण
जय श्रीरामच्या घोषणांची सक्ती करत, औरंगाबादमध्ये रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली. १० ते १२ अज्ञातांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती झोमॅटोचा कामगार असल्याचं समजलं आहे. वाचा सविस्तर :

२. चांद्रयान-२चे उड्डाण आज दुपारी
हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने गेल्या १५ जुलै रोजी उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलेले चांद्रयान-२चे उड्डाण आज सोमवारी, दुपारी २.४३ वाजता होत आहे. या उड्डाणाची उलटगणती रविवारी ६.४३ वाजता सुरू करण्यात आली. वाचा सविस्तर :

३. सचिन तेंडुलकरच्या एका कौतुकाच्या फोनमुळे हिमा दासचा आनंद द्विगुणित
भारताची धावपटू हिमा दास सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. चेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने ४०० मी. शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. गेल्या १९-२० कालावधीतलं हिमाचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. हिमा दासच्या कामगिरीची माहिती मिळताच संपूर्ण देशभरात तिचं कौतुक होतं आहे. वाचा सविस्तर : 

४. मी चुकलो, पण निर्णयाचे शल्य नाही -धर्मसेना
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘ओव्हर-थ्रो’च्या सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा असला तरी त्या निर्णयाचे मला मुळीच शल्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर :

५. ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’नंतर मार्व्हल स्टुडिओजकडून नव्या ११ प्रोजेक्ट्सची घोषणा
सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्व्हल स्टुडिओजने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. काही दिवसापूर्वी मार्व्हलचा ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. मात्र ही सिरीज संपल्यानंतर मार्व्हलचा आगामी चित्रपट कोणता असेल याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यातच मार्व्हल स्टुडिओजकडून त्यांच्या आगामी ११ चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :