हरयाणातील पलवल स्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्या समोरासमोर धडकल्या. अपघातात एक मोटरमन ठार झाला असून शंभरहून अधिक जण झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून हरिद्वारला जाणाऱया लोकमान्य टिळक एक्स्पेसला ईएमयूने समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही रेल्वे गाड्यांच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. रेल्वे अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळी रेल्वेचे बचावपथक दाखल झाले असून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2015 रोजी प्रकाशित
हरयाणात दोन रेल्वे गाड्यांची धडक, १ ठार
हरयाणातील पलवल स्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्या समोरासमोर धडकल्या.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 08-12-2015 at 12:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train collision in haryana leaves 1 dead 100 injured