रेल्वे भाडयात दहा वर्षात पहिल्यांदा दरवाढ केली गेली आहे. साधारण रेल्वे भाड्यात २ ते ४ पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे. तर स्लीपर क्लास मध्ये प्रति किलोमीटर ६ पैसे वाढ करण्यात होईल.
ही दरवाढ २१ जानेवारीपासून लागू करण्यात येईल. रेल्वे मंत्री पवन कुमार बंसल यांनी दरवाढ करण्याला पर्याय नव्हता असे म्हटले असून असंही म्हटलं आहे की आता रेल्वे अर्थसंकल्पात दरवाढ करण्यात येणार नाही.
साधारण दुसरा वर्ग उपनगरीय मध्ये २ पैसे प्रति किलोमीटर, साधारण दुसरा वर्ग मध्ये ३ पैसे आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये साधारण दुसरा वर्गासाठी ४ पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय एसी थ्री टायर आणि एसी चेयर कारमध्ये 10 पैसे प्रति किलोमीटर तसेच एसी टू टायरच्या भाड्यात १५ पैसे प्रति किलोमीटरची दरवाढ करण्यात आली आहे. एसी प्रथम वर्गाच्या भआज्याच ३० पैसे प्रति किलोमीटर दरवाढ होईल.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
१० वर्षात पहिल्यांदा रेल्वे भाडेवाढीची घोषणा; २१ जानेवारीपासून लागू
रेल्वे भाडयात दहा वर्षात पहिल्यांदा दरवाढ केली गेली आहे. साधारण रेल्वे भाड्यात २ ते ४ पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे. तर स्लीपर क्लास मध्ये प्रति किलोमीटर ६ पैसे वाढ करण्यात होईल.
First published on: 09-01-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train fare hike across board implimentation from 21st january