सध्या जगभरातील ग्राहकांनी डोक्यावर घेतलेल्या आयफोन, आयपॅडस्, आयपॉडस् आणि मॅसिन्तोश कम्प्युटर्ससारख्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या ‘अ‍ॅपल’ची यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न झाला असला तरी तो विफल झाला आहे. हॅकर्सना आमच्या संगणकीय नोंदीतील गोपनीय माहिती चोरता आली नाही, असे कंपनीने बुधवारी स्पष्ट केले.
आमच्या यंत्रणेतील अतिशय तुरळक भागात हॅकर्सच्या विषाणूंनी शिरकाव केला होता आणि तो तात्काळ उघड होऊन रोखला गेला, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या हॅकर्सचा शोध घेण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले असून प्रतिबंधात्मक उपायही योजले आहेत.