उत्तर प्रदेशमधील पोलीस दलातील शिपायांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. औरिया जिल्ह्यामध्ये शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पोलीस दलातील ऑन ड्युटी शिपाई भोजपूरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. आप्तकालीन मदत क्रमांक असणाऱ्या ‘युपी १००’ या विशेष पोलीस दलाचे हे जवान असल्याची माहिती आता समोर आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पोलिसांविरुद्ध चौकशी सुरु करण्यात आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेनेह हा व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केला आहे.

पोलिसांचे नाचण्याचे व्हिडीओ व्हायरल होणे काही नवीन नाही. ओडिशामधील एका वाहतूक पोलीस हवलदाराचा नाचत वाहतूक नियंत्रण करण्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मात्र सध्या व्हायरल झालेल्या उत्तर प्रदेशमधील या व्हिडीओतील पोलीस अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०१६ साली रस्ते अपघातातील जखमींना त्वरीत मदत मिळावी या उद्देशाने सुरु केलेल्या ‘युपी १००’ या विशेष पथकातील पोलिसच असे नाचताना दिसत असल्याने अनेकांनी त्यांच्यावर टिका केली आहे. त्यामुळेच पोलीस खात्याने या नाचणाऱ्या पोलिसांविरुद्ध चौकशी सुरु केल्याची चर्चा आहे.

मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांना या पोलिस शिपायांची बाजू घेतली आहे. पोलिस सुद्धा सामान्य माणसचं असतात त्यांना नाचण्याचा आणि जगण्याचा हक्क नाहीय का असा सवाल उपस्थित करत नेटकऱ्यांनी चौकशीला विरोध दर्शवला आहे. काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे पाहुयात…

यात चुकीचे काय?

लाच घेण्यापेक्षा हे बरं

https://twitter.com/md_tahir_/status/1042053234989432833

बाकी बरीच प्रकरण आहेत ज्यामध्ये पोलिसांनी लक्ष द्यायला हवे

आयटीत चालतं मग इथे का नाही

हा गुन्हा नाही

परदेशातील व्हिडीओ असता तर

https://twitter.com/official1anmol/status/1042055321085255686

एवढेही स्वातंत्र्य नाही?

चौकशी म्हणजे वेळेचा अपव्यय

आता नेटकऱ्यांचा हा आवाज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचून या पोलिसांवर होणारी काही कारवाई थांबते की त्यांच्यावर कारवाईचा बडगा पडतो हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल.