फ्रेन्च रेडिओ वाहिनीसाठी काम करणारे दोन पत्रकार युद्धग्रस्त सिरियात बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या वाहिनीच्या वतीने करण्यात आली आहे. डिडिअर फ्रॅन्कोइस आणि छायाचित्रकार एदुआर्द इलियास अशी या पत्रकारांची नावे आहेत. अधिक तपशील मिळविण्यासाठी हे दोन पत्रकार फ्रेन्च अधिकाऱ्यांसमवेत काम करीत होते, असे रेडिओ वाहिनीने एका निवेदनात म्हटले आहे. सिरियात बेपत्ता झालेल्या दोघा पत्रकारांच्या सुटकेचे आवाहन फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोइस होलांद यांनीही केले आहे.पत्रकार हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, तर ते काम करतात, त्यामुळे आपल्याला माहिती मिळते, असेही होलांद यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2013 रोजी प्रकाशित
सिरियात फ्रान्सचे दोन पत्रकार बेपत्ता
फ्रेन्च रेडिओ वाहिनीसाठी काम करणारे दोन पत्रकार युद्धग्रस्त सिरियात बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या वाहिनीच्या वतीने करण्यात आली आहे. डिडिअर फ्रॅन्कोइस आणि छायाचित्रकार एदुआर्द इलियास अशी या पत्रकारांची नावे आहेत.
First published on: 08-06-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two french journalists missing in syria