स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्ण महोत्सवाच्या वर्षांत अंदमानमध्ये होत असलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनापूर्वी ग्रंथ दिंडीही काढण्यात येणार असून, पुढील दोन दिवस साहित्याचा हा विश्वमेळा रंगणार आहे.
ऑफबीट डेस्टिनेशन व महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला स्वागताध्यक्ष व खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघडा, रांगोळीच्या पायघडय़ा टाकून ग्रंथिदडी काढली जाणार आहे. अंदमानातील मराठीजन व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले साहित्यप्रेमी मराठमोळ्या पोशाखात ग्रंथिदडीत सहभागी होणार आहेत.
उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारित कार्यक्रम, निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य, सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान तसेच ‘मला उमगलेले सावरकर व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद हे कार्यक्रम शनिवारी होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
विश्व साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन
अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 05-09-2015 at 00:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray to inaugurate akhil bharatiya marathi sahitya sammelan