उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ५५ वर्षीय भारत सिंह नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीचा खून करून त्याने मृतदेह चार दिवस घरातच ठेवल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत ही बाब त्याने शेजाऱ्यांना सांगितल्यामुळे हा प्रकार समोर आला. दरम्यान, आरोपी भारत सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पहिली पत्नी पैशांची मागणी करू लागली

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव सुनिता असे आहे. मृत सुनिता या आरोपी भारत सिंह याची दुसरी पत्नी होत्या. सुनिता यांचेदेखील हे दुसरे लग्न होते. हे दोघेही साधारण दोन वर्षांपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र भारत सिंह याने दुसरे लग्न केल्याचे समजताच त्याची पहिली पत्नी त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागली. याच कारणामुळे भारत सिंह आणि सुनिता यांच्यात वाद होऊ लागले. शेवटी रागाच्या भरात भारतने सुनिताचा गळा दाबून खून केला.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

दारूच्या नशेत शेजाऱ्यांना सांगितलं

सुनिताचा खून केल्यानंतर भारतने या महिलेचा मृतदेह घरातच चार दिवस ठेवला. दारूच्या नशेत भारतने ही बाब शेजाऱ्यांना सांगितली. तसेच इमारतीमध्ये दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी भारत सिंहच्या घरात जाऊन तपास केल्यानंतर सुनिता यांचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या मतानुसार सुनिता यांचा खून तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा.

गळा दाबून केला खून

मिळालेल्या माहितीनुसार सुनिता यांच्या पहिल्या पतीचे २०१२ साली निधन झाले होते. तर भारत याचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी भारतने सुनिता यांचा गळा दाबून खून केल्याचे म्हटले जात आहे. भारत हा दारूच्या दुकानात काम करतो. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने सुनिता यांचा खून केल्याचे कबुल केले आहे. तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.