लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दमदार एण्ट्री केली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून त्या निवडणूक लढवत आहे. पक्षप्रवेश केल्यापासूनच उर्मिला यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. लोकसत्ता डॉटकॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करण्यामागचं कारण, मनसेनं दिलेला पाठिंबा, सोशल मीडियापासून लांब राहण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीत त्यांनी राजकारणात येणाऱ्या स्त्रियांनाही महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

पाहा मुलाखत-

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत मातोंडकर यांच्यासमोर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविताना दडपण आले का, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर तर राजकारणात प्रवेश केल्यापासून द्वेष, मत्सर, दिलं. भरलेल्या संदेशांना मी तोंड देत आहे. अशा पळपुटय़ा, भित्र्या, स्वत:ची भूमिका नसलेल्या लोकांमुळे राजकारणाची पातळी खालावते आहे, अशा शब्दांत पहिल्यांदाच मातोंडकर यांनी ‘ट्रोलिंग’वर आपली भूमिका मांडली.