उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना समाजवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत होता, असा आरोप भाजपाने केला आहे.
मुरादाबादमधील बूथ क्रमांक २३१ येथे निवडणूक कर्मचाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली. निवडणूक कर्मचारी मतदारांना समाजवादी पक्षाच्या उमेदवारासमोरील सायकल चिन्ह असलेले बटण दाबायला सांगत होता, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी हा प्रकार वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.
#WATCH Moradabad: BJP workers beat an Election Official at booth number 231 alleging he was asking voters to press the 'cycle' symbol of Samajwadi party pic.twitter.com/FokdXCAJ1z
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 23, 2019
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने ईव्हीएमवर शंका उपस्थित करतानाच काही भागांमध्ये पोलीस मतदारांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे. काही भागांमध्ये जिल्हा प्रशासनही सत्ताधारी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही समाजवादीतर्फे केला जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपा विरुद्ध सपा असे युद्ध रंगले आहे.