उत्तर प्रदेशमधील ललितपुरमध्ये आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाचा धक्कादायक नमुना समोर आलाय. येथील एका तरुणाला करोनाची लस देताना इंजेक्शनची सुईच तुटली. त्यामुळे या तरुणाची प्रकृती बिघडली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. इंजेक्शन देताना सुई तुटल्याने या तरुणाला फार वेदाना होत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल नऊ दिवस सुईचा तुटलेला तुकडा या तरुणाच्या दंडामध्ये होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करुन हा सुईचा तुकडा बाहेर काढला असला तरी आता या तरुणाचा उजवा पाय आणि हात अंशत: निकामी झाल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या तरुणाचा उजवा हात आणि पाय सुन्न झाला असून हा निकामीपणा तात्पुरता असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या तरुणाला पुढील उपचारांसाठी झांशीला पाठवण्यात आलं आहे.

ज्या तरुणासोबत हा प्रकार घडला त्याचं नाव इंद्रेश अहिरवार असं आहे. २२ वर्षीय इंद्रेश हा बानौनी गावाचा रहिवाशी आहे. ९ सप्टेंबर रोजी गावामधील एका शाळेत भरवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान इंद्रेश लस घेण्यासाठी गेला होता त्यावेळी हा प्रकार घडला. इंद्रेशच्या घरच्यांनी केलेल्या दाव्यानुसार लस घेतल्यानंतर त्याच्या दंडावर फोडी आली आणि नंतर त्याला ताब आला. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतरही काहीच आराम इंद्रेशला मिळाला नाही. हळूहळू आपला हात सुन्न होत असल्याचं इंद्रेशला जाणवू लागलं. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये तो तपासणीसाठी गेला. त्यावेळी डॉक्टरांना तापसाणीदरम्यान इंद्रेशच्या दंडाजवळ शरीरामध्ये सुई असल्याचं आढळून आलं. सीटी स्कॅनमध्येही सुईचा तुकडा दंडात अडकल्याचं दिसून आलं. सीटी स्कॅन आणि एक्सरेच्या अहवालानंतर डॉक्टरांनी १८ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रीया करुन हा सुईचा तुकडा इंद्रेशच्या दंडामधून बाहेर काढला.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज

हात पाय सुन्नच

एक तास चाललेल्या या शस्त्रक्रीयेनंतर इंद्रेशला जरा दिलासा मिळाला असून वेदाना कमी झाल्या आहेत. मात्र सध्या त्याचा उजवा हात आणि पाय सुन्न अवस्थेतच आहेत. त्याची पुढील तपासणी झांशीमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील रुग्णालयामध्ये केली जाणार आहे.

एकाच व्यक्तीला एकाच वेळी दिले दोन डोस

काही दिवसांपूर्वी ललितपुरमध्ये रावर स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका व्यक्ती एकाच वेळी दोन डोस देण्याचा प्रकार उघडकीस आलेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. आता पुन्हा एकदा या तुटलेल्या सुईच्या प्रकरणामुळे आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणाचा कारभार समोर आलाय.