अनोन्ना दत्त, एक्स्प्रेस वृत्त

नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येईल. ती येत्या जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेला साडेसहा ते सात कोटी लसमात्रांचा साठा सरकारकडे आल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात येईल.गर्भाशय मुखाच्या कर्करोगाव्यतिरिक्त, ही लस ‘ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस’च्या प्रादुर्भावामुळे होणारा गुदद्वाराचा कर्करोग, योनी आणि घशाजवळील भागाच्या कर्करोगालाही प्रतिबंध करते.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

सध्या ‘एचपीव्ही’ लशीची एक मात्रा दोन हजार रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. परंतु सरकारने लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर ती मोफत देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.सलग तीन वर्षे राबवण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेत प्रत्येक वर्षी ९ ते १४ वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलींचे लसीकरण करण्यात येईल. लसीकरण मोहीमेची सुरुवात कोणत्या राज्यातून करावी, यावर सध्या सरकार विचार करीत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याची सांगता; ऋषी सुनक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा

तीन वर्षांत देशभरात ९ ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे आठ कोटी मुलीचें लसीकरण करण्यात येईल. पहिल्या वर्षी किमान दोन कोटी ६० लाख मुलींना लस देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लसीकरण मोहीम शाळा आणि सध्याच्या लसीकरण केंद्रांमध्ये राबवण्यात येईल.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश.

भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णांची नोंद, सुमारे ७५ हजार महिलांचा मृत्यू.

‘एचपीव्ही’ उपप्रकाराच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिक.

सीरमची सर्व्हाव्हॅक

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने देशी बनावटीची सर्व्हाव्हॅक ही ‘एचपीव्ही’ लस तयार केली असून ती बाजारात उपलब्ध आहे. सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक लससाठा तयार करण्याच्या दृष्टीने ‘सीरम’ प्रयत्नशील आहे. ‘सीरम’ची प्रतिवर्षी २० ते ३० लाख मात्रा तयार करण्याची क्षमता आहे. तथापि, ती वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे, असे ‘सीरम’च्या प्रवक्त्याने सांगितले.

येत्या जुलैपासून एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षे राबवण्यात येईल. प्रत्येक वर्षी ९ ते १४ वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलींचे लसीकरण करण्यात येईल.