फरार उद्योगपती विजय मल्ल्यावर भारतामध्ये कोट्यवधी रूपयांचे कर्ज असले तरी लंडनमध्ये तो सुखासीन आयुष्य जगत आहे. विजय मल्याच्या घरात सोन्याचे शौयचालय असल्याचा धक्कादायक खुलासा लेखक जेम्स क्रॅबट्री यांनी केला आहे. मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये लोकांना संबोधित करताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
जेम्स क्रॅबट्री म्हणाले की, विजय मल्ल्याच्या लंडनमधील घरी मी चार तास होतो, मोनाको ग्रँड प्रिक्स पहायला न जाता आल्यामुळे त्यावेळी तो उदास होता. इतर लोकांप्रमाणे घरात बसूनच मोनाको ग्रँड प्रिक्स पहावे लागले. त्यावेळी मल्ल्या मद्यपान करत होता. त्यावेळी मला शौचालयला जायचे होते. मला मल्याने रस्ता दाखवला. मी सोन्याचे शौचालय पाहून चकित झाल्याचे क्रॅबट्री म्हणाले. रीम आणि टॉप दोन्ही सोन्याचे असल्याचे जेम्स क्रॅबट्री म्हणाले. यावेळी हसत ते म्हणाले की, मला टॉयलेट पेपर सोन्याचे दिसले नाहीत.
#VijayMallya may be having and using golden commode but what comes out is not different one from common man. Better he should make set of Arthar jail Mumbai and be familiar with it before actually using it. @BT_India pl advice him. https://t.co/DXaqHQUCTZ
— rssoni (@rssoni) August 10, 2018
Is there any benefit of having golden WC especially on excretory system? #vijaymallya
— Existing in entropy (@allureg11) August 11, 2018
2 मार्च २०१७ला विजय मल्ल्याने भारतातून पलायन केले होते. त्याच्यावर १७ सार्वजनिक बँकांचे१० हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. सध्या मल्या लंडनमध्ये आहे.