भारतीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील लोकसभेच्या दोन जागा व विविध राज्यांमधील विधानसभेच्या १४ जागांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर या पोटनिवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.
Voting for by-polls to two parliamentary constituencies of Andhra Pradesh and Karnataka and 14 constituencies in various States to be held on 17th April: Election Commission of India pic.twitter.com/CahOU7CLNI
— ANI (@ANI) March 16, 2021
आंध्र प्रदेशमधील २३- तिरुपती आणइ कर्नाटकमध्ये २- बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर, विधानसभा पोटनिडणूक होणार असलेल्या ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर, गुजरातमधील मोरवा हदफ, झारखंडमधील मधुपुर, कर्नाटकमधील बसवकल्याण व मसकी, मध्यप्रदेशातील दामोह, मिझोरममधील सेरछीप, नागालॅण्डमधील नोकसेन, ओदिशातील पीपली, राजस्थानमधील सहारा, सुजानगढ व राजसमंद, तेलंगणातील नागार्जुन सागर आणि उत्तराखंडमधील साल्त यांचा समावेश आहे.