पंजाबमधील सर्व ११७ तर उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजप-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात आहेत.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
25 seats in North East are challenging for BJP
ईशान्येकडील २५ जागा भाजपसाठी आव्हानात्मक

उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेथेही मतदान होत आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या ५९ पैकी ४९ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या.