भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना घुसून मारतं, असा आरोप केला जातोय. या आरोपांवर अमेरिकेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानमधील होत असलेल्या हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या अहवालाचं निरिक्षण अमेरिकेकडून केलं जात असलं तरी या अहवालावर बोलण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, पाकिस्तानातील हत्येत भारताचा सहभाग असलेल्या आरोपांच्या अहवालावर आमचं निरिक्षण सुरू आहे. परंतु, मूळ आरोपांवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. तसंच, या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार नसलो तरी हा वाद वाढू नये म्हणून मध्यस्तीकरता संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are not going to us on reports of india conducting targeted kilings in pakistan sgk
First published on: 09-04-2024 at 13:14 IST