पार्कमध्ये एकत्र फिरणाऱ्यांचं जबरदस्तीने लावून दिलं लग्न; मुलाने केली आत्महत्या

या युवकाला आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसलेलं गावातल्या काही नेत्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं.

boy suicide after marriage
या दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं होतं.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या एका गावात एक मुलगा आणि एका मुलीचं काही पंचांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं. तर या लग्नानंतर या युवकाने आत्महत्या केली आहे. हे पंच तृणमूल काँग्रेसचे काही नेते होते.

या गावातल्या २० वर्षीय माणिक मंडल या युवकाला आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसलेलं गावातल्या काही नेत्यांनी पाहिलं. त्यानंतर या नेत्यांनी त्या दोघांना सोबत घेतलं आणि पंचायत भरवली. यावेळी सर्व पंचांनी मिळून ठरवलं की या दोघांचं लग्न लावून देण्यात येईल. या दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं होतं.

रविवारी या पंचांनी या दोघांना एका मंदिरात नेलं आणि लग्न लावून दिलं. लग्नानंतर या दोघांनाही या सर्वांनी माणिकच्या घरी सोडलं. घरी माणिकच्या आईने या लग्नाला मान्यता देण्याचं नाकारलं आणि या घटनेला विरोध केला. यावेळी माणिकचे वडील घरी नव्हते.

गावातल्या कोणीही या दोघांचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यांना जबरदस्तीने घरी सोडलं. माणिक आणि त्याच्या आईचे वादही याच कारणामुळे झाले. या वादानंतर माणिकने आत्महत्या केली. ही घटना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या मानकुट बांध भागात घडली. या गावामध्ये तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. याच पक्षाच्या नेत्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West bengal panchayat forced youth marriage boy committed suicide punishment love affair vsk

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या