जनगणना कार्यालयाचे भाकित
अमेरिकेतील गोरे नागरिक २०४३ या वर्षी अल्पसंख्याक ठरतील. देशाच्या इतिहासात प्रथमच ते आपला बहुसंख्याक दर्जा गमावतील, असे भाकीत अमेरिकी जनगणना कार्यालयाने वर्तवले आहे.
एकूण लोकसंख्येत अल्पसंख्याक गटांची बहुसंख्या अशी स्थिती देशात २०४३ मध्ये निर्माण होईल. हिस्पॅनिक (स्पॅनिश पाळेमुळे असलेले ) नसलेल्या गोऱ्यांचा गट हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा गट ठरेल. मात्र या वा इतर कोणत्याच गटाला बहुसंख्येचा दावा करता येणार नाही. जनगणना कार्यालयातर्फे देशातील लोकसंख्येबाबत २०६० पर्यंतची भाकिते बुधवारी वर्तविण्यात आली.
त्यात म्हटले आहे की, येत्या पन्नास वर्षांत अमेरिकेतील वांशिक तसेच पंथिक विविधता वाढत जाईल. सध्या अमेरिकी लोकसंख्येतील अल्पसंख्याक गटांचे प्रमाण ३७ टक्के एवढे आहे. हे प्रमाण २०६० या वर्षी ५७ टक्के असे भरघोस वाढेल. सध्या अल्पसंख्याक गटांची लोकसंख्या ११ कोटी ६२ लाख आहे. ती २४ कोटींच्या घरात जाईल. हिस्पॅनिकेतर गोऱ्यांची संख्या सध्या १९ कोटी ७८ लाख आहे. ती २०२४ मध्ये १९ कोटी ९६ लाख एवढी होईल. हिस्पॅनिक लोकसंख्या सध्या ५ कोटी ३३ लाख आहे. ती २०६० पर्यंत दुपटीहून अधिक म्हणजे १२ कोटी ८८ लाख होईल. त्या वेळी दर तीन अमेरिकी नागरिकांमध्ये एक हिस्पॅनिक असे प्रमाण होईल. सध्या हे प्रमाण सहा अमेरिकी नागरिकांमागे एक असे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
अमेरिकेत तीन दशकांत ‘गोरे’ होणार अल्पसंख्याक
अमेरिकेतील गोरे नागरिक २०४३ या वर्षी अल्पसंख्याक ठरतील. देशाच्या इतिहासात प्रथमच ते आपला बहुसंख्याक दर्जा गमावतील, असे भाकीत अमेरिकी जनगणना कार्यालयाने वर्तवले आहे.
First published on: 14-12-2012 at 04:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White skin people will be in minority within 30 years