scorecardresearch

“मी पक्का गुजराती झालोय, माझ्यासाठी काही नाव ठरवलंय का?”; WHO प्रमुखांच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर; म्हणाले “यापुढे मी तुम्हाला…”

भारतातील अनेक पिढ्यांनी तुळशीची पूजा केली, मोदींनी सांगितलं तुळशीचं महत्व

"मी पक्का गुजराती झालो आहे, माझ्यासाठी काही नाव ठरवलंय का?"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांना चक्क गुजराती नाव दिलं आहे. टेड्रोस यांनी केलेल्या विनंतीनंतरच मोदींनी त्यांना हे नाव दिलं आहे. गांधीनगरमध्ये ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशन समिट (Global AYUSH Investment and Innovation Summit) पार पडलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला तुलसीभाई म्हणताना आनंद होतो असं म्हटलं. भारतातील अनेक पिढ्यांनी तुळशीची पूजा केली असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

“जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस माझे चांगले मित्र आहेत. ते नेहमी मला भारतीय शिक्षकांनी मला शिकवलं आणि त्यांच्यामुळे मी घडलो असं सांगतात. आज त्यांनी मला मी पक्का गुजराती झालो आहे, माझ्यासाठी काही नाव ठरवलंय का? अशी विचारणा केली. त्यामुळे एक गुजराती म्हणून मी त्यांना तुलसीभाई म्हणणार आहे,” असं मोदींनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “सध्याची पिढी तुळशीला विसरत चालली आहे. अनेक पिढ्यांनी तुळशीची पूजा केली. लग्नातही तुळशीचं रोप वापरतात. त्यामुळे तुम्ही आता आमच्यासोबत आहात”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतात पारंपारिक उपचार घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा दिला जाईल असं जाहीर केलं. “आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे,” असं मोदी म्हणाले.

आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि नवे उपक्रम राबवण्याच्या शक्यता अमर्याद आहेत, असं सांगताना ते म्हणाले की, “आम्ही आधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ पाहत आहोत”. “आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत. हा हॉलमार्क भारतात उत्पादन करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केला जाईल,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान टेड्रोस यांनी यावेळी गुजरातीमध्ये भाषणाची सुरुवात केली. नमस्कार…कसे आहात सगळे? मजेत ना? गुजरातमध्ये येऊन मला खूप मजा आली अशी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who chief tedros ghebreyesus asks have you decided a name for me pm said tulsibhai sgy

ताज्या बातम्या