काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कथित जमीन गैरव्यवहारासंदर्भात संसदेत चर्चा करण्याची भाजपने केलेली मागणी काँग्रेसने मंगळवारी फेटाळली.
वढेरा हे राजकीय नेते नसल्याने त्यांच्याशी संबंधित प्रश्नावर सभागृहात चर्चा करता येणार नाही, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकार आणि संबंधित कायदा अंमलबजावणी संस्था ही बाब हाताळतील, असे काँग्रेसने म्हटले आहे.
देशातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या प्रश्नांबाबत संसदेत चर्चा करून आपण नवा पायंडा पाडू इच्छित नसल्याचे पक्षाच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी वार्ताहरांना सांगितले.