लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलण्याचा सपाटा लावल्याने त्यांच्यावर ही वेळ का आली याबाबत राजकीय वर्तुळात वेेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जेथे जेथे महायुतीला फायदा होऊ शकतो अशाच ठिकाणी हा उमेदवार बदल केल्याचे दिसून येत आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी
Ayodhya Poul Patil Post
हेमंत पाटील यांचं तिकिट कापलं गेल्यावर अयोध्या पौळ यांची खोचक पोस्ट, “जसा माझा श्रीकांत तसा हेमंत..”
supriya sule and prakash ambedkar
ठाकरे गटाबरोबर वाजलं, पण शरद पवार गटाला समर्थन; सुप्रिया सुळेंसाठी वंचितची माघार

निवडणूक घोषणेपूर्वी महाविकास आघाडीसोबत चर्चा करणारे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नंतर स्वतंत्रपणे काही उमेदवारांची यादी घोषित केली होती. त्यानंतर आता काही ठिकाणी बदल केले जात आहेत. विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचितने शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला होता. बुधवारी अचानक त्यांनी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला. वंचितच्या या निर्णयाचा फायदा शिंदे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाटय़, अनेक मतदारसंघांत बंडखोरी

अमरावती लोकसभा मतदार संघात पूर्वी वंचितने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्यांनी अर्ज भरला नव्हता. २ एप्रिलला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. पण वंचितने तो न दिल्याने आंबेडकर यांनी बुधवारी रात्री पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. पण, गुरुवारी दुपारी वंचितने आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही, आंबेडकर यांनी माघारीच्या निर्णयावर आपण कायम असल्याचे जाहीर केले. सध्या येथे वंचितचा उमेदवारच नाही.

मराठवाड्यात परभणीमध्ये वंचितने बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी दिली आहे. डक हे हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे म्हणून ओळखले जातात. ते मराठा आहेत. उद्धव ठाकरे गटाचा उमेदवारही मराठा आहे. परभणीतील मराठा केंद्रीत राजकारण बघता डक यांच्या उमेदवारीमुळे मराठा मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीच्या महादेव जानकर यांना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा

मराठवाड्यात परभणीमध्ये वंचितने पंजाबराव डक यांना उमेदवारी दिली आहे. डक यांच्या उमेदवारीमुळे मराठा मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महादेव जानकर यांना होण्याची शक्यता आहे.

वंचितच्या नवीन पत्राने कार्यकर्ते संभ्रमित

ज्या पक्षाला समर्थन जाहीर केले, त्या पक्षाच्या प्रचारात संमतीशिवाय सहभागी होऊ नये, असे नवीन पत्र वंचितने काढल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. एकीकडे काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन देत असताना या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी नवीन पत्र काढले. त्या पत्राद्वारे पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना मित्रपक्षाच्या प्रचाराला सूचना मिळाल्याशिवाय जाऊ नये, असे बजावण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्या मित्रपक्षांचे पदाधिकारी किंवा उमेदवार वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी संपर्क साधत आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांनी प्रदेश कार्यालयातून पक्षाची सूचना प्राप्त झाल्याशिवाय मित्रपक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असे रेखा ठाकूर यांनी पत्राद्वारे पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना कळवले आहे.