लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीमध्ये काही जागांवर पेच कायम असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे आणि मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची अद्याप प्रतीक्षाच आहे. रत्नागिरीची जागा शिवसेना शिंदे गट सोडण्यास तयार नसून सातारा मतदारसंघ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची तयारी नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दररोज रात्री जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी चर्चा करीत आहेत.

During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Gajanan Kirtikar vs Amol Kirtikar
बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा लढवणार; म्हणाले, “मुलगा पुढे जातोय तर…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी भाजपने निश्चित केली असून त्यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराची आखणी करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र अजूनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे सांगत असल्याने आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही प्रचार व मतदारसंपर्क सुरू केल्याने ही जागा भाजप लढणार की शिवसेना याबाबत कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम आहे. या मतदारसंघात शिंदे गटाची अजिबात ताकद नसल्याचे राणे यांनी जाहीरपणेच सांगितल्याने शिवसेना नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा >>>भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध तपासणी ठप्प; एफडीएमधील ८० टक्के अधिकारी, कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर

सातारा

सातारा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे यांना भाजपकडूनच उमेदवारी हवी असून त्यांनी गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीहून परतल्यावर उदयनराजे यांचे जोरदार स्वागतही झाले आणि त्यांनी मतदारसंपर्क व निवडणूक लढविण्याची तयारीही सुरु केली. मात्र त्यांच्या उमेदवारीस अजित पवार यांनी कडाडून विरोध केला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून उदयनराजे यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अजित पवार यांची भूमिका आहे. तर उदयनराजे व पवार यांच्यात मतभेद असल्याने ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास अजिबात तयार नाहीत. त्यामुळे फडणवीस हे दोघांचीही समजूत घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा >>>महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला! मार्चअखेरपर्यंत ५४७१ पैकी ४३३२ प्रकल्प मंजूर!

मुंबईतील तीन मतदारसंघ

मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर मध्य व वायव्य मुंबई या तीन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. दक्षिण मुंबईची जागा मनसेने मागितली असली तरी ती त्यांना मिळण्याची शक्यता नसून तेथून भाजपचाच उमेदवार असणार आहे. वायव्य मुंबईचा मतदारसंघावरील दावा शिंदे गट सोडण्यास तयार नसून काँग्रेसला रामराम ठोकलेले माजी खासदार संजय निरुपम यांचा तेथून विचार होऊ शकतो. पण शिंदे गटात त्यांचा प्रवेश होण्यात अडचणी आल्यास निरुपम यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्याही पर्यायावर विचार करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतून भाजपने विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर या मराठी नेत्यास उमेदवारी दिली, तर उत्तर मध्य मतदारसंघातून उत्तर भारतीय नेत्याला उमेदवारी मिळू शकते. भाजपने उत्तर मुंबईतून पियूष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा हे दोन अमराठी उमेदवार दिले आहेत.  भाजपने ठाण्याच्या जागेवरील दावा कायम ठेवल्याने अद्याप मुंबईतील जागांचाही पेच तसाच ठेवण्यात आला आहे. उर्वरित जागांबाबत दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.