मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील एका २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीये.
दातिया जिल्ह्यातील दंग करेरा गावात पाच नराधमांनी या महिलेवर बलात्कार केला. या पाच नराधमांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या दीरासोबत शेरशा गावातून दंग करेरा गावात परत येत असताना पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवून या दोघांना थांबविले आणि दीराला मारहाण केली. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
मध्य प्रदेशात महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये भाजपचा नगरसेवक
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील एका २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीये.

First published on: 10-04-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman gangraped in mpthe accused include a bjp corporator